मुख्य मजकुराकडे जा
९०२२४ ४७९९०
पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

सभासद व्हा

सभासद कसे व्हावे?

पारिजात ही सहकारी पतसंस्था आहे. म्हणजे सभासद हेच संस्थेचे खरे मालक आहेत. सभासद झाल्यावर आपण ठेवी ठेवू शकता, कर्ज घेऊ शकता आणि संस्थेच्या नफ्यातून लाभांश मिळवू शकता.

पायऱ्या

  1. जवळच्या शाखेतून सभासद अर्ज घ्या आणि भरा.
  2. भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह शाखेत जमा करा. भागाची (शेअर) रक्कम किती आहे, हे शाखेत विचारा.
  3. पुढील संचालक मंडळ सभेत आपल्या अर्जावर निर्णय घेतला जातो.
  4. मंजुरीनंतर आपण पारिजातचे सभासद बनता.

आवश्यक कागदपत्रे

यादी तयार ठेवा

  • फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा (उदा. वीज बिल किंवा भाडेकरार)

सभासद का व्हावे?

  • कर्ज फक्त सभासदांनाच मिळते.
  • सभासदांना दरवर्षी लाभांश मिळतो. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी तो ७% आहे.
  • बचत खाते फक्त ₹५०० पासून उघडता येते.
  • दैनंदिन ठेव दररोज ₹५० पासून सुरू करता येते.

सभासद झाल्यानंतर

  • बचत खाते, दैनंदिन ठेव, आवर्त ठेव किंवा मुदत ठेव सुरू करा.
  • गरज पडल्यास कर्जासाठी अर्ज करा.
  • ‘Parijat MBank’ व ‘Parijat MPassbook’ ॲप आणि SMS सेवा वापरा.
  • दरवर्षी लाभांश मिळवा.
सभासदत्व रद्द करायचे असल्यास
  1. सभासद राजीनामा अर्ज भरून शाखेत द्या.
  2. संस्थेची सर्व देणी चुकती करा.
  3. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर सभासदत्व रद्द होते.

चौकशी फॉर्म

आपली माहिती भरा. आमच्या शाखेतून लवकरच आपल्याला फोन येईल.