मुख्य मजकुराकडे जा
९०२२४ ४७९९०
पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

सेवा

कोअर बँकिंग सोल्यूशन (CBS)

सर्व शाखांमधील खाती एकाच संगणक प्रणालीवर, कोणत्याही शाखेतून व्यवहार करा.

संस्था स्थापनेपासून सभासदांना संगणकीकृत सेवा देत आहे. सन २०१७ पासून संस्था बँकांप्रमाणे वेब-आधारित कोअर बँकिंग सोल्यूशन (CBS) वापरते. त्यामुळे सभासद एकाच ठिकाणाहून सर्व शाखांतील आपल्या खात्यांवर व्यवहार करू शकतात.

फायदे

  • कोणत्याही शाखेतून आपल्या खात्यावर व्यवहार, ABB (Any Branch Banking).
  • कर्ज व ठेव खात्यांवरील शिल्लक रक्कम क्षणात समजते.
  • खाते उतारा (स्टेटमेंट) आणि जामीनकीचा तपशील त्वरित मिळतो.
  • CBS मुळे RTGS / NEFT द्वारे पैसे पाठवणे, SMS सेवा, MPassbook, MBank मोबाईल ॲप व इतर सेवा सहज उपलब्ध झाल्या.

कसे वापरावे?

  1. संस्थेच्या कोणत्याही शाखेत जा.
  2. आपल्या खात्याचा तपशील सांगून व्यवहार करा किंवा शिल्लक / खाते उतारा मागा.
  3. अधिक माहितीसाठी किंवा सुविधा सुरू करण्यासाठी जवळच्या शाखेत भेट द्या.
सावध राहा: पारिजात सोसायटी कधीही फोनवर OTP, PIN किंवा पासवर्ड विचारत नाही.

कोअर बँकिंग सोल्यूशन (CBS)

चौकशी फॉर्म

आपली माहिती भरा. आमच्या शाखेतून लवकरच आपल्याला फोन येईल.