मुख्य मजकुराकडे जा
९०२२४ ४७९९०
पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

१९९७ पासून · संपूर्ण महाराष्ट्र

आपली पारिजात

विश्वास, सेवा आणि प्रगतीचा प्रवास

‘पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.’ची स्थापना १९९७ साली वाशी, नवी मुंबई येथे झाली. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी सहकाऱ्यांनी मिळून ही संस्था सुरू केली. सभासदांचे आर्थिक स्थैर्य आणि समाजाची प्रगती हा त्यामागचा उद्देश होता.

पहिल्या दिवसापासून पारदर्शक व्यवहार, शिस्तबद्ध आर्थिक नियोजन आणि विश्वासार्ह सेवा हीच आमची तत्त्वे राहिली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, सोपी आणि आधुनिक बँकिंग सेवा देणे हेच आमचे ध्येय आहे. आज पारिजात ही सहकार क्षेत्रातील एक आघाडीची आणि विश्वासार्ह पतसंस्था आहे.

संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, पनवेल, दादर, ठाणे तसेच पुण्यात धनकवडी, हडपसर, सिंहगड रोड आणि चंदननगर येथे आमच्या शाखा आहेत. नेरूळ, नवी मुंबई येथे संस्थेचे स्वतःच्या मालकीचे प्रशस्त मुख्य कार्यालय आहे.

आम्ही बचत, आवर्त आणि मुदत ठेवी तसेच महिला सक्षमीकरण ठेव योजना देतो. वैयक्तिक, व्यवसाय, गृह, सोने तारण आणि वाहन कर्जासोबत महिला व लघु उद्योगांसाठी विशेष कर्जेही देतो. ‘Parijat MBank’, ‘Parijat MPassbook’ ॲप आणि NEFT / RTGS / IMPS / UPI सारख्या डिजिटल सेवांमुळे सभासद कोणत्याही शाखेतून व्यवहार करू शकतात.

विश्वासार्ह आर्थिक सेवा

सभासदांना पारदर्शक आणि सुरक्षित बँकिंग सेवा. बचत, मुदत ठेवी आणि कर्जासाठी विश्वासाचे ठिकाण.

सभासद-केंद्रित दृष्टिकोन

सभासदांच्या आर्थिक गरजा समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सुविधा देणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.

स्थिर वाढ आणि लाभांश

आम्ही सर्व सभासदांना नियमित लाभांश देतो; त्यातून आर्थिक स्थैर्य मिळते आणि सर्वांच्या प्रगतीला चालना मिळते.

संस्थेची वैशिष्ट्ये

  • ₹३५० कोटींहून अधिक एकत्रित व्यवसाय.
  • कर्ज थकबाकी अत्यल्प आणि थकीत (NPA) कर्जांसाठी १००% पेक्षा जास्त तरतूद.
  • एकूण कर्जांपैकी ९५% पेक्षा जास्त कर्जे तारणावर दिलेली आहेत.
  • मुख्य कार्यालय आणि पाच शाखांची कार्यालये स्वतःच्या मालकीची.
  • बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले संचालक मंडळ.
  • प्रशिक्षित, अनुभवी व कर्तव्यदक्ष कर्मचारी आणि हसतमुख सेवा.
  • महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या ‘दीपस्तंभ’ पुरस्काराने पाच वेळा सन्मानित.
  • ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्काराने आठ वेळा सन्मानित.

आमची मूल्ये

सहकाराची मूल्ये
सहकाराची मूल्ये जपणे आणि सभासदांची आर्थिक प्रगती.
विश्वास
प्रत्येक सभासदाशी विश्वासाचे नाते.
पारदर्शकता
प्रत्येक व्यवहारात प्रामाणिकपणा आणि स्पष्टता.
सेवा
प्रत्येक सभासदाला तत्पर, कार्यक्षम आणि सौजन्यपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न.
नवकल्पना
तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक बँकिंगचा अनुभव.
संचालक मंडळआर्थिक स्थितीवार्षिक अहवालपुरस्कार व सन्मानसामाजिक उपक्रमफोटो गॅलरीकरिअर