सभासदत्व
संस्थेचे सभासद कसे होता येईल?
सभासद अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या शाखेत जमा करा. पुढच्या संचालक मंडळ सभेत मंजुरी मिळाल्यावर आपण संस्थेचे सभासद बनता.
सभासद होण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा (उदा. वीज बिल किंवा भाडेकरार).
सभासदत्व रद्द करता येते का?
हो. सभासद राजीनामा अर्ज द्या आणि सर्व देणी चुकती करा. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर सभासदत्व रद्द होते.
ठेवी
माझ्या ठेवी सुरक्षित आहेत का?
संस्था सर्व शासकीय व सहकारी नियमांनुसार काम करते. संस्थेची ९५% कर्जे सुरक्षित तारणावर दिलेली आहेत आणि सर्व व्यवहार पारदर्शक आहेत.
खाते उघडण्यासाठी किमान किती रक्कम लागते?
बचत खाते ₹५०० पासून उघडता येते. इतर योजनांसाठी रक्कम योजनेनुसार वेगळी असते.
दैनंदिन ठेव म्हणजे काय?
यात आपण दररोज ठरावीक रक्कम संस्थेच्या ठेव प्रतिनिधीकडे जमा करता. ठरावीक कालावधीनंतर सगळी रक्कम व्याजासह एकत्र परत मिळते.
दैनंदिन ठेव किमान किती रकमेपासून सुरू करता येते?
साधारणपणे दररोज ₹५० पासून सुरू करता येते. त्यापेक्षा जास्त रक्कम आपल्या सोयीनुसार निवडता येते.
ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळते का?
हो. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, माजी सैनिक आणि गृहनिर्माण संस्थांना १ वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या मुदत ठेवींवर व मासिक व्याज प्राप्ती ठेवींवर ०.५०% जास्त व्याज मिळते.
कर्ज
कोणत्या प्रकारची कर्जे मिळतात?
वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, स्थावर (मालमत्ता) तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, LIC / KVP / NSC तारण कर्ज आणि सोने तारण कर्ज.
कर्जासाठी अर्ज कसा करायचा?
आधी सभासद व्हा. नंतर कर्ज मागणी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह शाखेत द्या आणि कर्ज मंजुरीसाठी संस्थेच्या अधिकाऱ्यांना भेटा.
वैयक्तिक कर्जासाठी जामीनदार लागतो का?
हो, वैयक्तिक कर्जासाठी जामीनदार आवश्यक आहे. हे कर्ज ₹१ लाखापर्यंत आणि जास्तीत जास्त ६० महिन्यांच्या मुदतीसाठी मिळते.
कर्ज लवकर फेडल्यास शुल्क लागते का?
वैयक्तिक कर्ज आणि स्थावर तारण कर्जाच्या मुदतपूर्व कर्जफेडीसाठी कोणतेही शुल्क नाही.
सर्वसाधारण
ठेवी आणि कर्जाचे व्याजदर काय आहेत?
व्याजदर बाजारस्थितीनुसार ठरतात. सध्याचे दर या वेबसाइटवरील ‘व्याजदर’ पानावर पाहा.
ग्राहक सेवेसाठी संपर्क कसा साधायचा?
वेबसाइटवरील संपर्क फॉर्म, ईमेल किंवा फोनद्वारे संपर्क साधा. आमचे कर्मचारी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील.
नवीन योजना किंवा ऑफर्स कशा कळतील?
नवीन योजनांची माहिती आमच्या वेबसाइटवर, सोशल मीडिया पेजेसवर, शाखेच्या WhatsApp नंबरवरून किंवा थेट शाखेत दिली जाते.
शाखांची कामाची वेळ काय आहे?
सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते संध्याकाळी ६. महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी आणि सर्व रविवारी शाखा बंद असतात.
मोबाईलवर पासबुक कसे पाहायचे?
Google Play Store वरून ‘Parijat MPassbook’ ॲप डाउनलोड करा आणि आपल्या Client ID ने रजिस्टर करा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
