सेवा
Parijat Next ठेव प्रतिनिधी ॲप
दैनंदिन ठेव प्रतिनिधी आपल्या दारात येऊन पैसे घेतात, ते लगेच खात्यात जमा होतात आणि आपल्याला त्वरित SMS येतो.
दैनंदिन ठेव प्रतिनिधी हा संस्था आणि सभासद यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. ते दररोज सभासदांच्या घरी व व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन सेवा देतात. संस्थेने प्रतिनिधींना ‘Parijat Next’ मोबाईल ॲप दिले आहे. त्यातून ते लगेच खात्यावर पैसे जमा करतात आणि सभासदाला त्वरित SMS येतो.
फायदे
- प्रतिनिधी दररोज आपल्या घरी / दुकानात येतात.
- प्रतिनिधीकडे दिलेले पैसे लगेच खात्यात जमा होतात.
- प्रत्येक जमा रकमेचा SMS लगेच आपल्या मोबाईलवर येतो.
- बचत खाते, चालू खाते, आवर्त ठेव, दैनंदिन ठेव आणि कर्ज खात्यांवर व्यवहार.
कसे वापरावे?
- आपल्या भागातील दैनंदिन ठेव प्रतिनिधी आपल्याकडे येतात.
- आपली रक्कम प्रतिनिधीकडे द्या.
- प्रतिनिधी ॲपद्वारे लगेच आपल्या खात्यात रक्कम जमा करतात.
- आलेला SMS तपासा, तो आपल्या जमेचा पुरावा आहे.
सावध राहा: पारिजात सोसायटी कधीही फोनवर OTP, PIN किंवा पासवर्ड विचारत नाही.
Parijat Next ठेव प्रतिनिधी ॲप
चौकशी फॉर्म
आपली माहिती भरा. आमच्या शाखेतून लवकरच आपल्याला फोन येईल.
