मुख्य मजकुराकडे जा
९०२२४ ४७९९०
पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

तारण कर्ज

LIC / KVP / NSC तारण कर्ज

LIC विमा पॉलिसी, किसान विकास पत्र (KVP) किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) तारण ठेवून कर्ज.

व्याजदर

१२.००%

वार्षिक

व्याजदर
१२%*
कमाल कर्ज
₹१५,००,०००
कमाल कालावधी
१२ महिने
कर्ज किती मिळते
सरेंडर व्हॅल्यूच्या ७०% पर्यंत

फक्त सभासदांसाठी

कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने संस्थेचे सभासद असणे आवश्यक आहे.

दर बदलू शकतात

व्याजदर वेळोवेळी बदलू शकतात.

आपली विमा पॉलिसी किंवा बचत प्रमाणपत्रे न मोडता त्यांच्या तारणावर कर्ज मिळवा. सरेंडर व्हॅल्यूच्या (आज मोडल्यास मिळणारी रक्कम) ७०% पर्यंत कर्ज, शाखास्तरावर त्वरित मंजुरी.

ही योजना कोणासाठी?

  • LIC पॉलिसी, KVP किंवा NSC असलेले सभासद
  • औषधोपचार, घरदुरुस्ती किंवा शिक्षणासाठी पैसे हवे असलेले
  • वैयक्तिक किंवा व्यवसायाच्या गरजेसाठी कर्ज हवे असलेले

हे कसे चालते?

  1. आपली LIC पॉलिसी / KVP / NSC घेऊन शाखेत या.
  2. पॉलिसी / पत्रावर संस्थेच्या नावाने बोजा (असाइनमेंट) नोंदवा.
  3. सरेंडर व्हॅल्यूच्या ७०% पर्यंत कर्ज शाखास्तरावर त्वरित मंजूर होते.
  4. १२ महिन्यांत कर्जाची परतफेड करा.

कर्ज कशासाठी मिळते?

  • औषधोपचार खर्च
  • घरदुरुस्ती
  • मुलांचे शिक्षण
  • गृहोपयोगी वस्तूंची खरेदी
  • व्यवसाय आणि इतर कारणे

वैशिष्ट्ये आणि फायदे

  • वैयक्तिक वापरासाठी किंवा व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध.
  • विमा पॉलिसी, किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या तारणावर शाखास्तरावर त्वरित कर्ज मंजुरी.
  • कर्ज मर्यादा ₹१५ लाखांपर्यंत.
  • कर्ज कालावधी १२ महिने.
  • व्याजदर १२%*.

पात्रता

  • कर्ज मागणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे.
  • LIC / KVP / NSC च्या सरेंडर व्हॅल्यूच्या ७०% पर्यंत कर्ज मंजूर होते.
  • LIC / KVP / NSC वर संस्थेच्या नावाचा बोजा (असाइनमेंट) नोंदवणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

यादी तयार ठेवा

  • कर्ज अर्जावर कर्जदाराचा फोटो.
  • कर्जदाराचे ओळखीचे व राहण्याच्या पत्त्याचे पुरावे.
  • विमा पॉलिसी तारणासाठी योग्य असावी आणि तिचे आजपर्यंतचे सर्व हप्ते (प्रीमियम) भरलेले असावेत.

व्याजदर तक्ता

  • कमाल १२ महिने

    १२.००%

    कमाल रक्कम₹१५,००,०००

* व्याजदर वेळोवेळी बदलू शकतात. · १५ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर केलेले दर

स्वतः हिशेब करून पाहा

रक्कम, व्याजदर आणि कालावधी टाकल्यावर मुदतीनंतर किती मिळेल किंवा हप्ता किती येईल हे लगेच कळेल.

₹५,००,०००

= १ वर्ष

मासिक हप्ता (EMI)

₹४४,४२४

१२.००% · १ वर्ष

कर्ज रक्कम
₹५,००,०००
एकूण व्याज
₹३३,०९३
एकूण परतफेड
₹५,३३,०९३

हा अंदाजे हिशेब आहे (मासिक कमी होणाऱ्या शिल्लक कर्जावर व्याज गृहीत धरले आहे). प्रत्यक्ष हप्ता संस्थेच्या नियमांनुसार थोडा वेगळा असू शकतो. कृपया शाखेत खात्री करून घ्या.

वर्षनिहाय परतफेड तपशील
वर्षभरलेले मुद्दलभरलेले व्याजशिल्लक कर्ज
१₹५,००,०००₹३३,०९३₹०

LIC / KVP / NSC तारण कर्ज

चौकशी फॉर्म

आपली माहिती भरा. आमच्या शाखेतून लवकरच आपल्याला फोन येईल.

यासारख्या इतर योजना

सर्व पाहा