व्यवसाय कर्जासाठी EMI, एकूण व्याज, प्रोसेसिंग फी आणि मोरेटोरियम/EMI-holiday चा परिणाम तपासा. आपण मोरेटोरियममध्ये 'केवळ व्याज फेडणे' किंवा 'व्याज कॅपिटलायझेशन' हे निवडू शकता.
मोरेटोरियम / EMI-holiday (वैकल्पिक)
सूचना: EMI फॉर्म्युला वापरला जातो. मोरेटोरियमचा परिणाम निवडलेल्या प्रकारानुसार दर्शविला जातो; वास्तविक बँक नियम वेगळे असू शकतात.
व्यवसाय कर्जाची वैशिष्ट्ये आणि फायदे
- नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायवृद्धीसाठी कर्ज उपलब्ध.
- कर्ज मर्यादा रु.५0 लाखांपर्यंत.
- कर्ज कालावधी - ८४ महीने.
- व्याजदर - १३%*
व्यवसाय कर्जाची पात्रता
- कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे.
- सभासदाची पत तपासण्यासाठी बचत / दै. ठेव खात्यावर व्यवहार आवश्यक आहेत.
- वैयक्तिकरित्या कर्ज परतफेड करण्याची क्षमता असावी.
- ही मुदत कर्जे स्वयंरोजगार, किरकोळ व्यापार, लघुउद्योग, मोठे उद्योग, व्यवसायवृद्धी आणि इतर नियोजित कारणांसाठी देण्यात येतील.
- या कर्जासाठी स्थावर मालमत्ता, चल मालमत्ता, यंत्रसामग्री, कच्चा माल, तयार वस्तू व विक्री बिल न तारण घेऊन वैयक्तिक नावाने, भागीदारी संस्थेच्या नावाने कर्ज दिले जाईल.
व्यवसाय कर्जाची आवश्यक कागदपत्रे
- कर्ज अर्जावर कर्जदार आणि जामीनदार यांचे फोटो आवश्यक.
- कर्जदार आणि जामीनदार यांचे वेतनपत्रक तसेच मागील ३ वर्षांचे CA प्रमाणित आयकर विवरणपत्र आवश्यक.
- कर्जदार व जामीनदार यांचे ओळख व वास्तव्याचे पुरावे.
- कर्जदार व जामीनदार यांच्या मागील ६ महिन्यांच्या बँक स्टेटमेंट/पासबुकच्या प्रती.
- उद्योग व व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारचे परवाने आवश्यक आहेत.
- यंत्रसामग्री, मालमत्ता आणि माल साठा यांची पत्रके आवश्यक आहेत.
- कर्जास तारण दिलेल्या मालमत्ते संबंधी सर्व आवश्यक कागदपत्रे.
अर्ज
आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!
आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!
आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी करा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!