सभासदांना पारदर्शक आणि सुरक्षित बँकिंग सेवा देते. बचत व मुदत ठेवी आणि कर्ज यांसाठी विश्वासू ठिकाण.
सोसायटीचा मुख्य उद्देश सभासदांच्या आर्थिक गरजा समजून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
सोसायटी आपल्या सर्व सभासदांना नियमित लाभांश देऊन आर्थिक स्थैर्य आणि परस्पर विकासाला प्रोत्साहन देते.
‘पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. नवी मुंबई.’ ही संस्था सभासदांचे आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रगतीसाठी १९९७ साली वाशी, नवी मुंबई या ठिकाणी बँकिंग क्षेत्रात काम करणार्या अनुभवी सहकार्यांनी मिळून स्थापन केली. सुरुवातीपासूनच पारदर्शक व्यवहार, शिस्तबद्ध आर्थिक नियोजन आणि विश्वासार्ह सेवा या तत्त्वांवर संस्थेची पायाभरणी झाली. आज ‘पारिजात सोसायटी’ ला सहकार क्षेत्रातील एक आघाडीची व विश्वासार्ह सहकारी पतसंस्था म्हणून नावलौकिक प्राप्त आहे.
संस्थेचा उद्देश केवळ आर्थिक व्यवहारांपुरता मर्यादित नसून सदस्यांच्या सर्वांगीण विकासाचा आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, सोपी आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे.
आजच ‘पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. नवी मुंबई.‘ या पतसंस्थेत ठेवी ठेवा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!
दैनंदिन बचत ठेव
बचत खाते
अल्प मुदत ठेव
मुदत ठेव
मासिक प्राप्ती ठेव
दाम दुप्पट ठेव
आवर्त ठेव
‘पारिजात सोसायटी’ने आपल्या सातत्यपूर्ण प्रगती आणि प्रामाणिक सेवेद्वारे सभासदांचा विश्वास जिंकला आहे. प्रत्येक निर्णय आणि योजना सभासदांच्या हिताचा विचार करूनच आखली जाते.
या कार्यक्षमतेच्या आणि सेवाभावाच्या मान्यतेसाठी सोसायटीला राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, जे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.





विहित नमुन्यातील सभासद अर्ज भरून, आवश्यक कागदपत्रांसह आमच्या शाखेत जमा करावा लागेल. लगतच्या मा. संचालक मंडळ सभेतील मंजुरीनंतर आपण सभासद व्हाल.
वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, व्यवसायिक कर्ज, स्थावर तारण कर्ज, शासकीय रोखे तारण कर्ज आणि सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध आहेत.
व्याजदर बाजारस्थितीनुसार ठरवले जातात. अद्ययावत दरांसाठी कृपया आमची वेबसाइट पहा अथवा शाखेशी संपर्क साधा.
आपण आमच्या वेबसाइटवरील संपर्क फॉर्म, ईमेल, किंवा फोन नंबर द्वारे सहज संपर्क साधू शकता. आमचे कर्मचारी आपणास तत्काळ संपर्क करतील.
फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि पत्त्याचा पुरावा (उदा. वीज बिल किंवा भाडेकरार) आवश्यक आहेत.
सभासद झाल्यानंतर कर्ज मागणी अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित शाखेत सादर करा आणि कर्ज मंजुरीसाठी सोसायटीच्या अधिकाऱ्यांशी भेट घ्यावी.
होय, संस्था सर्व शासकीय व सहकारी नियमांनुसार काम करत आहे. तसेच संस्थेचा ९५% कर्ज वाटप हा सुरक्षित तारणी कर्जामध्ये आहे. आणि संस्थेचा आर्थिक व्यवहार पारदर्शक असा आहे.
रु. 500/- पासून बचत खाते उघडता येते, परंतु योजना प्रकारानुसार रक्कम जमा करावी लागेल.
होय, विहित नमुन्यातील सभासद राजीनामा अर्ज सादर करून आणि सर्व देणी पूर्ण केल्यानंतर संचालक सभा मंजुरी नंतर सभासदत्व रद्द करता येते.
आमच्या वेबसाइट, सोशल मीडिया पेजेस, शाखेतील Whats App no वरून किंवा शाखेमार्फत नवीन योजना आणि ऑफर्सची माहिती दिली जाते.
ही अशी योजना आहे ज्यामध्ये सभासद दररोज ठराविक रक्कम ठेव प्रतींनिधी कडे जमा करतो आणि ठराविक कालावधीनंतर एकत्र रक्कम व्याजासह परत मिळते.
साधारणपणे रु. ५० पासून दैनंदिन ठेवी सुरू करता येतात. तसेच आपल्या सोयीनुसार रक्कम निवडता येते.