जय महाराष्ट्र!
'पारिजात पतसंस्थेचे' काम पारदर्शी आहे. कर्मचार्यांकडून ग्राहक सेवेचा चांगला अनुभव येतो. संस्थेच्या शाखेत आल्यानंतर फक्त पतसंस्थेत आल्यासारखे नाही, तर कुटुंबात आल्यासारखे वाटते.
- श्री. बाळासाहेब दारकुंडे सभासद, नेरूळ शाखा.
'पारिजात सोसायटी'चे कामकाज हे पारदर्शक व उत्तमरित्या चालू आहे. तसेच एक सभासद म्हणून आम्हाला चांगली सेवा 'पारिजात सोसायटी' च्या कर्मचारी वर्गाकडून मिळते.
'पारिजात सोसायटी' ला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरात लवकर ५०० कोटी ठेवींचा टप्पा पार पडो ही श्रीचरणी प्रार्थना. धन्यवाद ! आभार !
- श्री. मयूर सु. शिंदे सभासद, ठाणे शाखा.
मी श्रीमती. वर्षा नायर, माझा पारिजात संस्थेशी संबंध एक वर्षापासून आला, परंतु वर्षभरात जे काही आर्थिक व्यवहार संस्थेशी केले त्यामध्ये खूपच चांगले सहकार्य संस्थेच्या कर्मचारी वर्गाकडून मिळाले. त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. यापुढे संस्थेशी सलंग्न राहण्यासाठी या अनुभवामुळे मला हुरूप आलेला आहे.
- श्रीमती. वर्षा नायर सभासद, नेरूळ शाखा.
आपली 'पारिजात पतसंस्था' ही ठेवीदारांना व्यवस्थित सेवा देत असून खास करून जेष्ठ नागरिकांची काळजी घेते त्याबद्दल आभारी आहे.
- श्री. राजेंद्र ब. नायर सभासद, वाशी शाखा.
'पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.' ही आपली संस्था ठेवीदारांकरिता आणि इतर व्यवहारांकरिता उल्लेखनीय काम करीत आहे व पुढील काळात संस्थेची चांगली प्रगति होईल ही अपेक्षा करतो.
- श्री. रमेश रा. सोनवणे सभासद, वाशी शाखा.
सन्मान
उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान
पारिजात क्रेडिट सोसायटीने आपल्या सातत्यपूर्ण प्रगती आणि प्रामाणिक सेवेद्वारे सभासदांचा विश्वास जिंकला आहे. प्रत्येक निर्णय आणि योजना सभासदांच्या हिताचा विचार करून आखली जाते.
या कार्यक्षमतेच्या आणि सेवाभावाच्या मान्यतेसाठी सोसायटीला राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, जे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.




