विश्वास, सेवा आणि प्रगतीचा प्रवास
‘पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. नवी मुंबई’ ही संस्था सभासदांचे आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रगतीसाठी १९९७ साली वाशी, नवी मुंबई या ठिकाणी बँकिंग क्षेत्रात काम करणार्या अनुभवी सहकार्यांनी मिळून स्थापन केली. सुरुवातीपासूनच पारदर्शक व्यवहार, शिस्तबद्ध आर्थिक नियोजन आणि विश्वासार्ह सेवा या तत्त्वांवर संस्थेची पायाभरणी झाली. आज ‘पारिजात सोसायटी’ ला सहकार क्षेत्रातील एक आघाडीची व विश्वासार्ह सहकारी पतसंस्था म्हणून नावलौकिक प्राप्त आहे.
संस्थेचा उद्देश केवळ आर्थिक व्यवहारांपुरता मर्यादित नसून सदस्यांच्या सर्वांगीण विकासाचा आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, सोपी आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे.
संस्थेच्या सेवा
‘पारिजात सोसायटी’ने आपल्या सभासदांसाठी विविध बचत ठेवी,आवर्त ठेवी आणि मुदत ठेवी तसेच महिला सक्षमीकरण ठेव या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. कर्ज क्षेत्रात आम्ही वैयक्तिक, व्यावसायिक, गृहकर्ज, सोने तारण कर्ज, वाहनकर्ज तसेच महिला आणि लघु उद्योगांसाठी विशेष कर्ज देत आहोत. सर्व कर्जांची प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने केली जाते. ‘पारिजात सोसायटी’ने काळानुसार तांत्रिक प्रगती स्वीकारली आहे. आमच्या सभासदांसाठी “Parijat Mbank” मोबाईल बँकिंग ॲप, “Parijat Mpassbook” मोबाईल ॲप, NEFT / RTGS / IMPS / UPI यासारख्या आधुनिक आणि डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सर्व आधुनिक सुविधांमुळे सभासदांना कोणत्याही शाखेत जाऊन बँकिंग व्यवहार करता येत आहेत.
संस्थेचे कार्यक्षेत्र
‘पारिजात सोसायटी’ चे कार्यक्षेत्र ‘संपूर्ण महाराष्ट्र राज्य’ असे आहे. संस्थेच्या शाखा मुंबई विभागात वाशी, नेरुळ, पनवेल, कोपरखैरणे, दादर, ठाणे, तर पुणे विभागात धनकवडी, हडपसर, सिंहगड रोड आणि चंदननगर अशा विविध ठिकाणी कार्यरत आहेत. तसेच संस्थेचे नेरूळ, नवी मुंबई येथे स्वमालकीचे प्रशस्त व सुसज्ज असे प्रशासकीय कार्यालय आहे. प्रत्येक शाखेत अनुभवी कर्मचारी आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत.
संस्थेच्या सेवा
पारिजात सोसायटीने आपल्या सभासदांसाठी विविध बचत ठेवी,आवर्त ठेवी आणि मुदत ठेवी तसेच महिला सक्षमीकरण ठेव या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. कर्ज क्षेत्रात आम्ही वैयक्तिक, व्यावसायिक, गृहकर्ज, सोनेतारण कर्ज, वाहनकर्ज तसेच महिला आणि लघु उद्योगांसाठी विशेष कर्ज योजना देत आहोत. सर्व कर्ज प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने केली जाते. ‘पारिजात सोसायटी’ने काळानुसार तांत्रिक प्रगती स्वीकारली आहे. आमच्या सभासदांसाठी “Parijat Mbank” मोबाईल बँकिंग अॅप, “Parijat Mpassbook” मोबाईल अॅप, NEFT / RTGS / IMPS / UPI यासारख्या आधुनिक आणि डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सर्व आधुनिक सुविधांमुळे सभासदांना कोणत्याही शाखेत जाऊन बँकिंग व्यवहार करता येत आहेत.
संस्थेचे कार्यक्षेत्र
पारिजात सोसायटी’ चे कार्यक्षेत्र ‘संपूर्ण महाराष्ट्र राज्य’ आहे. संस्थेच्या शाखा मुंबई विभागात वाशी, नेरुळ, पनवेल, कोपरखैरणे, दादर, ठाणे, तर पुणे विभागात धनकवडी, हडपसर, सिंहगड रोड आणि चंदननगर अशा विविध ठिकाणी कार्यरत आहेत. तसेच संस्थेचे नेरूळ, नवी मुंबई येथे स्वमालकीचे प्रशस्त व सुसज्ज असे प्रशासकीय कार्यालय आहे. प्रत्येक शाखेत अनुभवी कर्मचारी आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत.
संस्थेची वैशिष्ट्ये
- संस्थेचा ३५० कोटीहुन अधिक संमिश्र व्यवसाय.
- कर्ज थकबाकीचे अत्यल्प प्रमाण व NPA ची १००% पेक्षा जास्त तरतूद.
- एकूण कर्जाच्या ९५ % पेक्षा जास्त तारणी कर्जाचे वितरण.
- प्रशासकीय कार्यालय व पाच शाखांची कार्यालये स्वमालकीची.
- बँकिंग क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले संचालक मंडळ.
- प्रशिक्षित, अनुभवी व कर्तव्यदक्ष कर्मचारी वृंद व सस्मित सेवा.
- महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या ‘दिपस्तंभ’ पुरस्काराने पाच वेळा सन्मानित.
- 'बँको पतसंस्था’ पुरस्काराने आठ वेळा सन्मानित.
संस्थेची मुल्ये
- सहकार मुल्य – सहकार मूल्यांची जपणूक व सभासदांची आर्थिक प्रगती.
- विश्वास – प्रत्येक सभासदाशी विश्वासाच नातं.
- पारदर्शकता – व्यवहारांमध्ये प्रामाणिकता आणि स्पष्टता.
- सेवा – प्रत्येक सभासदाला तत्पर, कार्यक्षम आणि सौजन्यपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न.
- नवकल्पना – तांत्रिक साधनांचा वापर करून आधुनिक बँकिंगचा अनुभव.
आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी करा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!