वाहन तारण कर्जाचे वैशिष्ट्ये आणि फायदे
- खासगी वापर किंवा व्यावसायिक वापरासाठी वाहन खरेदी करण्यासाठी अल्पावधीत कर्ज उपलब्ध.
- कर्ज मर्यादा रु.५0 लाखांपर्यंत.
- कर्ज कालावधी ८४ महीने.
- व्याजदर १३%*
वाहन तारण कर्जाची पात्रता
- कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे.
- सभासदाची पत तपासण्यासाठी बचत / दै. ठेव खात्यावर व्यवहार आवश्यक आहेत.
- कर्ज वितरित करताना संस्थेमध्ये दुरावा रक्कम जमा करणे आवश्यक आहे.
- तारण वाहनाच्या आर.सी. बुक वर आर.टी.ओ. कडे भार (Hypo.) नोंद करणे आवश्यक आहे.
- आर.टी.ओ. कडील सर्व संबंधित फॉर्म पूर्ण करणे आवश्यक आहे.
वाहन तारण कर्जाची आवश्यक कागदपत्रे
- कर्ज अर्जावर कर्जदार आणि जामीनदार यांचे फोटो आवश्यक.
- कर्जदार आणि जामीनदार यांचे वेतनपत्रक तसेच मागील ३ वर्षांचे CA प्रमाणित आयकर विवरणपत्र आवश्यक.
- कर्जदार व जामीनदार यांचे ओळख व वास्तव्याचे पुरावे.
- कर्जदार व जामीनदार यांच्या मागील ६ महिन्यांच्या बँक स्टेटमेंट/पासबुकच्या प्रती.
- नवीन वाहन कर्ज घेण्यासाठी अधिकृत डिलरकडून कोटेशन (टेंडर) घेणे आवश्यक आहे.
- नवीन वाहनाच्या बुकिंगची पावती आवश्यक आहे.
अर्ज
आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!
आपल्या विश्वासाची पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!
आजच पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेत ठेवी करा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!