दैनंदिन ठेव प्रतिनिधी हा पतसंस्था व ग्राहक यांच्यामधील महत्वाचा दुवा आहे. दैनंदिन ठेव प्रतिनिधी हा सभासदांना दररोज त्यांच्या घरी व व्यवसायाच्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन सेवा देतो. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन ठेव प्रतिनिधीला ही संस्थेने ‘पारिजात नेक्स्ट’ हे मोबाईल ॲप देऊन डिजिटली सक्षम केले आहे. ठेव प्रतिनिधी सभासदांच्या खात्यावर या ॲपद्वारे तत्काळ (Real Time) पैसे जमा करतो व त्याचा SMS सभासदास लगेच मोबाईलवर प्राप्त होतो. या ॲपमधून दै. ठेव प्रतिनिधी हे बचत खाते, चालू खाते, आवर्त ठेव खाते, दै. ठेव खाते व कर्ज खाते इ. वर व्यवहार करतात.