ठेवी
बचत खाते
बचत खाते ही संस्थेकडून दिली जाणारी एक महत्वाची व लोकप्रिय सेवा आहे. बचत खात्यात सभासद आपले पैसे सुरक्षित ठेवू शकतात आणि त्यावर व्याज मिळवू शकतात. हे खाते दैनंदिन गरजा पूर्ण करते, त्यामुळे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गरज पडल्यास काढण्यासाठी याचा वापर करता येईल. रोख किंवा ऑनलाइन मोबाइल बँकिंगद्वारे पैसे काढू शकतात. बचत खात्यात पैसे जमा करणाऱ्या व्यक्तीला नामनिर्देशन (नॉमिनी) करण्याची सोय उपलब्ध आहे. जेणेकरून खातेदाराच्या मृत्यूनंतर वारसदाराला त्याचा लाभ मिळू शकेल.